विभाज्यतेच्या कसोट्या

📊घटक -   विभाज्यतेच्या कसोट्या.📊

📌 2 ची कसोटी -
 " ज्या संख्या च्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्याना 2 ने नि:शेष भाग जातो "
📎 उदाहरणार्थ -  3458 , 23570
वरील दोन्ही संख्या च्या एकक स्थानी अनुक्रमे 8 व 0 हे अंक आहेत
      म्हणून  3458 व 23570 ला 2 ने नि:शेष भाग जातो.
----------------------------------------------
📌 3 ची कसोटी -
  " दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पाढ्यातील असेल तर त्या संख्या स 3 ने निःशेष भाग जातो "

                किंवा
    " दिलेल्या संख्या च्या अंकाची बेरीज एक अंक ऐईपर्यंत करत रहिले तर त्या अंकास 3 ने भाग जात असेल तर ती त्या संख्या स 3 ने निःशेष भाग जातो "

📎उदाहरणार्थ  -  6399996327
 या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज 63 येते.
पुन्हा  63 ची बेरीज  6+3 = 9 येते . अशी एक अंकी बेरीज आणायची आता  9 ला 3 ने भाग जातो .
 म्हणून सर्व संख्यास 3 ने निःशेष भाग जातो .
--------------------------------------------------

📌 4 ची कसोटी -
    " दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थान च्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निःशेष भाग जात असेल तर ती पुर्ण संख्यास 4 ने निःशेष भाग जातो

-----------------------------------------------
📌 5 ची कसोटी -
    " संख्या च्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर ती संख्या 5  ने विभाज्य असते "

-----------------------------------------------
📌 6 ची कसोटी -
   " जर दिलेल्या संख्येला  2 व 3 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो  "

-----------------------------------------------
📌 8 ची कसोटी -
    " संख्येच्या एकक , दशक व शतक स्थानच्या अंकानी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 8 ने निःशेष भाग जातो  "

---------------------------------------------
📌 9 ची कसोटी -
    " संख्येच्या सर्व अंकाची बेरीज एकक मिळेपर्यत करून 9 येत असेल तर ती संख्या 9 ने निःशेष भाग जाणारी असते  "

------------------------------------------------
📌 10 ची कसोटी  -
   " संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक असेल तर त्या संख्येस 10 ने निःशेष भाग जातो  "

-----------------------------------------------
📌  11 ची कसोटी -
   " संख्येच्या अंकाची एकआड एक बेरीज केली असता अलेल्या बेरजेतील फरक  0 किंवा 11 च्या पटीत येत असेल तर त्या संख्या ला 11 ने निःशेष भाग जातो "
==========================
📌 13 ची कसोटी -
    " दिलेल्या संख्या च्या एकक स्थानचा अंकाची ...चार पट करून संख्या च्या राहीलेल्या भागात मिळवत जावे.
   असे करत गेल्यास शेवटी येणाऱ्या संख्येस 13 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस 13 ने निःशेष भाग जातो.

उदाहरणार्थ  -   16926


1692 + 24 = 1716
   
171  + 24 =  195

 19  + 20  = 39

येथे  39 ला 13 ने पुर्ण भाग जातो .....

म्हणून  16926 ला पण 13 ने निःशेष भाग जातो.

=========================

📌  17 ची कसोटी  -
     एकक स्थानचा अंकाची 5 पट राहीलेल्या संख्येतून वजा करत गेल्यास शेवटी  17 ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संपूर्ण संख्येला 17 ने निःशेष भाग जातो .

उदाहरणार्थ  -   4352

4352  =  435  - 10  = 425

425    =     42  - 25  =  17

17 ला 17 ने भाग जातो.
म्हणून  4352 ला पण 17 ने पुर्ण भाग जातो.

उदाहरणार्थ  .  436832

436832 = 43683 - 10=43673

43673 = 4367 - 15  = 4352

4352 = 435  - 10  = 425

425   = 42  - 25  =  17

म्हणून ....436832 ला  17 ने निःशेष भाग जातो
                      
==========================

📌 19 ची कसोटी -

वरीलप्रमाणे ....एकक दुप्पट करून मिळवा.

📌 23 ची कसोटी -
एकक 7 पट करून मिळवा...

📌 29 ची कसोटी -
एकक 3 पट करून मिळवा....

📌  31 ची कसोटी -
एकक 3 पट करून वजा करावे...

📌 37 ची कसोटी -
एकक 11 पट करून वजा करावे...

No comments:

Post a Comment