कोरोना विषाणू बाबत

कोरोना विषाणू 

महत्त्वपूर्ण व सकारात्मक बाबी 

डॉ. सुबोध खरे, एमडी
┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄


हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.

COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.

बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.

१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.

गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.

रोग प्रसार-  या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.

अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.

बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.

करोना विषाणू पासून आपला बचाव-
१) बाहेर जाऊन आल्यावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे

हा रोग होण्याची शक्यता-
आपण चीन, इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.

हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लस तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.

आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.

चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात.

अत्यंत महत्त्वाची गोष्ट-
 या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल

सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे.

मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.

भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.

वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशोधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.

हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.

पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम.डी असे लिहिले तरी चालेल.

लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड" दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.


डॉ. सुबोध खरे
एम.डी.

कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी  
1. कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो , त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही.
2. विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही.
3.कपड्यांवर पडलेला विषाणू 9 तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास  विषाणू मरतो.
4. हातावर पडलेला विषाणू 10 मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे.
5. थंड अन्न आणि icecream खाणे टाळा.
6. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफ्फुसात संसर्ग होत नाही.
7. 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही.

No comments:

Post a Comment